धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ.) येथील सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तेरणा सहकारी साखर कारखाना प्रशाला तेरणा नगर, ढोकी येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रति वर्ष प्रमाणे यावर्षीही बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. पुढील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सुजाता सतीश शिंदे, संचिता व्यंकट गुंड, मानसी गणपती गुंड, रेणुका सतीश चव्हाण, गणेश कलिकेश गाते, आदित्य सुखलाल गुंड, नरहरी गोविंद मुळे यांच्या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, समुद्रवाणी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी बापू शिंदे, समुद्रवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख चाऊस, तालुका क्रीडा संयोजक बिभीषण पाटील, माजी मुख्याध्यापक बुद्धिबळचे राष्ट्रीय पंच गोरे, बुद्धिबळचे राज्यस्तरीय पंच महादेव भोरे, रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सुरेश मनसुळे, मुख्याध्यापक सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक शेख, जावळे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.