परंडा (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ  शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर यांच्या संयुक्त सहीने सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर पदाचा कार्यकाल हा 2028 पर्यंत राहणार आहे.डॉ.शहाजी चंदनशिवे यांची शैक्षणिक सामाजिक संशोधन व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमध्ये धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तु .दा. गंगावणे यांनी डॉ शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन व कौतुक केले.त्यांच्या या निवडीमुळे  गुरुवर्य प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव, डॉ.गजानन राशिनकर व समस्त महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील  मित्र परिवार यांनी डॉ.शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top