भूम (प्रतिनिधी)-  शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे लवकरच अजित पवार गटांमध्ये प्रवेश करणार असल्याचे तालुक्यासह मतदारसंघांमध्ये चर्चा चालू आहे.

तिन्ही तालुक्यामध्ये बैठका झाल्याचे चर्चेली जात आहे येत्या 5 ऑगस्ट किवा 9 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे.

प्रवेश करतात महामंडळ किंवा राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची भूम शहरात जोरदार चर्चा चालू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजी सावंत यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार राहुल मोटे प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त कळत आहे.

परंडा मतदारसंघांमध्ये माजी आमदार राहुल मोटे मागील कार्यकाळामध्ये तीन वेळेस सलग आमदार म्हणून निवडणूक जिंकली होती. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार राहुल मोटे यांचा निसटता पराभव झाला. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत हे थोड्या फरकाने विजयी झाले. परंडा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाला मोठा चेहरा पक्ष वाढीसाठी दुसरा कोणता नसल्याने माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश करून पुढील काळात अजित पवार गटाकडून त्यांना महामंडळ किंवा राज्यमंत्रीपद मिळू शकते ? असा कवयास बांधला जात आहे. 


संपर्क नाही

यासंदर्भात माजी आमदार राहुल मोटे यांच्या भ्रमणध्वनीवर रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. भूम-परंडा-वाशी मतदारसंघात मात्र भैय्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर सत्तेतील कोणते ना कोणते पद मिळेल. आणि मतदारसंघाला पालक मिळेल असे बोलले जात आहे. 


 
Top