तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तक्रारदारांचा आरोप आहे की आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे तुळजाभवानी भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, यामुळे तुळजापूरची प्रतिमा मलिन झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.