वाशी (प्रतिनिधी)-  जि. प. प्रा.शाळा पारडी येथे इको क्लब अंतर्गत पर्यावरणूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

गणपती बाप्पा हा बालकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.घराघरातुन गणपती बाप्पाचे आगमन होते.आकर्षक गणेशमुर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना होते आणि चतुर्दशीला विसर्जन होते. पण अशा मुर्तींसाठी केमीकलयुक्त रंगाचा वापर केला जातो पर्यायाने विसर्जन केल्यानंतर ते रासायनीक घटक पर्यावरणात मिळतात व पर्यायाने पर्यावरणाला हानी पोहोचते. या बाबींची बालमनावर जाणीव करून देत काळी माती,शाडू मातीचा वापर करून गणपती बनवण्याची कृती त्यांना करुन दाखवली. त्या मातीमध्ये फुलांच्या,परिसरात उपलब्ध फळ बिया घातल्या ज्यामुळे अशा गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आपोआपच एखादे रोपटे रुजेल आणि आपल्या पर्यावरणाला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल .या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली व बालकांनी हि जमेल तसे पर्यावरण पूरक गणपती बनवत उस्फुर्त प्रतिसाद दिला.


 
Top