धाराशिव (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता संवाद मिळावा दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सकाळी 11 वाजता लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  मातंग समाजातील विविध मागण्यांसाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी मातंग समाजातील सर्व घटकांनी आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले आहे. सदर मेळाव्यामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण, आर्टी, क्रांतिवीर, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक आदी विषयांवर विचार विनिमय होणार आहे.तरी सर्वांनी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 
Top