तुळजापूर (प्रतिनिधी)- अपसिंगा-काक्रंबा संयुक्त पाणीपुरवठा योजनेत गंभीर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष शेख अमीर इब्राहीम यांनी पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन दिले असून, विभागीय चौकशी लावावी अशी मागणी केली आहे.कामाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे.ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरी कारवाई होत नाही.या प्रकरणाबाबत अपसिंगा ग्रामपंचायत सरपंच अजित क्षीरसागर आणि काक्रंबा ग्रामपंचायत सरपंच कालिदास खताळ यांनी लेखी तक्रार दिली आहे. तर राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी देखील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “पिण्याच्या पाण्यासारख्या जनजीवनाशी निगडित योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.”

 
Top