परंडा (प्रतिनिधि) -परंडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविणारी आधार सामाजिक संस्था परंडा व अजित फाऊंडेशनच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम शहर व तालुक्यातील जि.प.शाळेत राबविण्यात आला.

 सामाजिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपलेली आधार ही संस्था मागील 8 वर्षांपासून शालेय साहित्य वाटप करत असते.संस्थेचा उद्देश हा प्रत्येक घटकाला लाभ पोहोचवणे हा आहे. त्याच अनुषंगाने साहित्याविना कोणी वंचित राहू नये, विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने आज     गुरुवार दि.31 रोजी परंडा शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद मुलीची शाळा,जि.प.प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळा,जि.प.प्राथमिक शाळा, कंडारी, जि.प. प्राथमिक शाळा जामगांव,जि.प.प्राथमिक शाळा, कात्राबाद, जि.प. शाळा खासगाव ता.परंडा येथील एकूण 570 विध्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी, उपाध्यक्ष शंकर जाधव,उर्मिला गरड,तौफिक माशायक, सोहेल काझी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या साहित्या मध्ये स्कूल बॅग,वह्या, चित्रकला वही,पेन, पेन्सिल, रंगपेटी, रंगीत पेन्सिल, पाण्याची बाटली,कंपास पेन्सिल-शार्पनर-पट्टीआदीसह वाटप करण्यात आले.    

 
Top