धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणला गेलेल्या गणपतीच्या पूजेसाठी गर्दी. श्रावण महिना व तीस वर्षानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली असल्यामुळे गणेश भक्तांनी सकाळपासून अभिषेक व नवस व संकल्प पूर्ण झाल्या बद्दल पूजा दूर्वा, मोदक ,पेढे श्री च्या चरणी अर्पण करीत होते दिवसभर गणेश भक्तांनी पूजा आरती मंत्र विविध विधी केला जात होता.चंद्रोदय नऊ वाजून 13 मिनिटाच्या वेळी पूजा विधिस महिलांनी गर्दी केली होती.
यावेळी काशिनाथ दिवटे यांनी आपल्या गोड व मंजुळ आवाजात गणपतीची आरती, श्री जगदंबा आरती, महादेवाची आरती व मंत्र उच्चार, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधि संपन्न झाला. मंडळाचे गणेश दूत, सेवक व पदाधिकारी, लेझीम खेळाडू इत्यादींनी उपस्थित राहून अत्यंत प्रसन्नतेच्या व आनंदीमय वातावरणात संपन्न झाली.