धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांनीच केली आहे. विशेषता या रस्त्याची कामे त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर असताना केलेली आहेत. त्यातच भुयारी गटार योजनेची कामे सुरु केली. मात्र, ताबडतोब दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्या रस्त्याची जबाबदारी त्यांचीच आहे. तरी देखील ते विरोधकांच्या नावाने बोंब मारीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहराध्यक्ष सोमनाथ गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांजा रोड ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे त्या रस्त्याची कामे करावीत अशी मागणी केली आहे. तसेच जर या रस्त्याचे काम तात्काळ झाले नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतू हा केवळ नगर परिषद निवडणुकीसाठी (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून आमदार व खासदार यांची प्रतिमा सुरक्षित ठेवण्याचा व लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून मूग गिळून गप्प बसण्याचा मार्ग त्यांनी पत्करला असल्याचे मुंडे यांनी नमूद केले आहे.