तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे पोकरा योजने अंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक राम शिंदे यांनी कीड व रोगाची ओळख करणे तसेच किड ओळखून यांच्या नियंत्रणासाठी उपाय योजना करणे. फोरोमन ट्रॅप ची माहिती व त्याचा उपयोग पिकात कसा करावा याबद्दल माहिती दिली तसेच किड व रोग नियंत्रणाच्या जैविक व रासायनिक पद्धती यांची माहिती दिली. कीटक नाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या संबंध  माहिती दिली.  यावेळी उमेदचे तेर प्रभाग सहन्वयक राम अंकुलगे,बचत गटाच्या कृषी व्यवस्थापक रोहिणी सूरवसे, कृषी सखी संगिता लंगाळे,बचत गटाच्या प्रेरीका पूजा चव्हाण, वैशाली देवकते, भाग्यश्री भक्ते,ज्योती नाईकवाडी व महीला उपस्थित होत्या.

 
Top