भूम, (प्रतिनिधी)- परांडा-भुम विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये सर्वत्र अतिवृष्टी झालेली असल्याने तिन्ही तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा. अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे.
मागील काही दिवसांमध्ये 243 परांडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेले असून, ही अतिवृष्टी तिन्ही तालुक्यात सगळीकडेच झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे, जनावराचे नुकसान झालेले असून पडझड ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
परंतु असे असताना प्रशासनाच्या सदोष पर्जन्यमापक यंत्रणेमुळे फक्त वाशी तालुक्यातीलच महसूल मंडळाचा समावेश अतिवृष्टीमध्ये झालेला असून भूम, वाशी आणि परांडा तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश अतिवृष्टी मध्ये झालेला नाही. वास्तविक पाहता पाऊस हा सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर झालेला आहे तरी माननीय साहेबांनी 243 परंडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करणे आणी सरसकट सर्वांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठीची उपाययोजना करण्यासाठी संबंधीतांना सूचना देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे.