तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथील पंचेचाळीस वर्षीय महेश शहाजी खंडाळकर या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेत गट क्रमांक 544, खंडाळकरवस्ती येथे त्यांचा मृतदेह चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
शवविच्छेदनानंतर महेश यांच्यावर मंगरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.