भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वालवड येथील लेंडीच्या पुलावरून गेल्या तीन चार दिवसापासून गुडघाभर पाणी वाहत असून याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने वालवडच्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुराच्या पाण्यात आंदोलन करत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.

तालुक्यातील वालवड गावातील भारतीय दूरसंचार निगम कार्यालयाच्या जवळील पुलावर अति पावसाच्या पाण्यामुळे  पाथरूड-बार्शी रस्ता बंद पडत असल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना तीन दिवसापासून शाळेला येता आले नाही. या भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाच्या खालच्या बाजूला .असणाऱ्या नळ्या पूर्णपणे बुजल्यामुळे पाणी पुलावरून वाहत आहे. हा पुल गावातील मुख्य रस्त्यांना जोडणारा आहे. बार्शी येथे वैद्यकीय कामानिमित्त व शैक्षणिक विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने .मागील आठवडाभरापासून हा रस्ता बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करू नये कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे उपसरपंच कृष्णा मोहिते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुलावरून जाणाऱ्या पुराच्या पाण्यामध्येच बसून दोन तास आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन तरी भेट देत लगेच जेसीबीच्या साह्याने काम चालू केले आहे. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.


 
Top