धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संकुलाचे प्रशासकीय अधिकारी व एसबीएनएम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस पी पॉलिटेक्निक व डॉ. व्ही के कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य अमरसिंह कवडे, आर पी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गाझी शेख, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, बीएड कॉलेजचे प्राचार्य  ऋषिकेश लोमटे, डेरी कॉलेजचे प्राचार्य बालाजी वाघमारे, प्रा.अनिल वाघमारे,आयटीआयचे व्यवस्थापक डी.एम.घावटे, अकाउंटट योगेश मंडलिक, जय हिंद जुनिअर कॉलेजचे प्रा. शुभम देशमुख तसेच संकुलातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक, लिपिक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top