धाराशिव,(प्रतिनिधी)- पुस्तकी ज्ञान सोबतच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे ही गरजेचे आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा क्लासरूम मध्ये निर्माण झालेला गॅप दूर करून उपयोजित ज्ञान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ रजनीश कामत यांनी केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा २१ वा वर्धापन दिन शनिवारी (दि.१६) उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मुख्य सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. रजनीश के. कामत (कुलगुरु, डाॅ. होमी भाभा विद्यापीठ, मुंबई) उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमास प्र सत्कारमूर्ती, प्रा. भास्कर चंदनशिव,प्र - कुलगुरु प्रा. डाॅ. वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, प्रा. डॉ.अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर आणि प्रभारी संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांची व्यासपीठावर उपस्थित होती.
प्र- कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे यांनी विद्यापीठ उपपरिसरच्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविकात सादर केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव २००४ मध्ये सुरु झाले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १७ विद्यार्थ्यांनी नेट व सेट परीक्षेत यश मिळविले. तर १४ विद्यार्थ्यांना पी. एच. डी. प्रदान करण्यात आली, असे ते म्हणाले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या
प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी अनुवादित केलेल्या चार ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख अतिथी . डाॅ. रजनीश कामत यांनी उच्च शिक्षण व संशोधन या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
मानवी जीवनास मूल्यांचे अधिष्ठान मिळणे महत्वपूर्ण आहे. वक्तृत्व हे आत्म्याच प्रतिबिंब असते. जनरेशन झेड या वर्गातील अनेक युवक आहेत. वैयक्तिक आव्हाने समजून घेऊन, विद्यार्थांना शिकविले पाहिजे. ओपन एआय च्या जगात आपण आहोत. शिक्षण पद्धतीत नविन प्रवाह येत आहेत. दोन्ही मेंदूचा समतोल उपयोग केला तर विद्यार्थी यशस्वी होतो. शिकणे शिकविण्याच्या पद्धतीत बदल घडविणे आवश्यक आहे. एकाग्रतेचा कालावधी निश्चित असतो. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या आतमध्ये जे पूर्णत्व आहे, त्याला चालना देण्याचे काम शिक्षण करित असते. जीवनात मुल्य अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षणावर जीडीपी सहा टक्के इतकी रक्कम खर्च होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. सृजनशीलता, सहकार्य, समीक्षात्मक विचार, संभाषण कौशल्य इ. विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. आऊटलुक रॅकिंग मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास तिसरे स्थान मिळाल्याबद्दल त्यांंनी अभिनंदन केले.
विद्यापीठाच्या गौरवशाली वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध कथाकार, समीक्षक प्रा. भास्कर चंदनशिव यांना मान्यवरांच्या हस्ते 'जीवनसाधना पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले. डाॅ. गणेश शिंदे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मह्टले की साहित्य मूल्यांच्या संवर्धना शिवाय जगत नाही. प्रत्येक कलाकृतीची एक रचना असते. विचार मांडणे आणि विचार जगणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. "रानसय" हे पुस्तक व्यक्तीगत जीवनावर आधारित आहे, असे ते म्हणाले.कथांचे मुल्य महत्वाचे आहेत. सहा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. लिहिण आणि वाचण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या मुल्यांशी, जगण्याशी निगडित आहेत. चित्रकलेची आवड होती. त्यांनी सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुलगुरू
प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोप केला. एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, विद्यापीठाच्या वतीने प्रा. वेदकुमार वेदालंकार यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात आले. त्यांची मुळ लेखन प्रेरणा ग्रामीण जीवनाशी निगडित आहे. संशोधनात मुलभूत संकल्पनेशी ठाम राहिले पाहिजे. तळमळीने संशोधन झाले पाहिजे. स्थानिक प्रश्नावर संशोधन झाले पाहिजे. सर्वांनी झोकून देऊन काम केले पाहिजेत. अशा प्रकारचे संशोधन झाले पाहिजे, की समाजाला, विद्यार्थांना फायदा झाला पाहिजे. संशोधन पद्धत विकसित झाली पाहिजे. विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. आत्मियतेने सर्वांनी काम केले पाहिजे. प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी यांनी कठोर मेहनत करुन, संस्था नावारूपास आणली पाहिजे. उपपरिसराचे नाव देशात होईल, असे विचार त्यांनी केले व्यक्त केले. डॉ. महेश्वर कळलावे यांनी सूत्रसंचालन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. वेदकुमार वेदालंकार, व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. गजानन सानप, डॉ. संजय साळुंके, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा, डॉ. वैशाली खापर्डे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा, डॉ. गौतम पाटील, डॉ. भारत खंदारे, डॉ. रविकिरण सावंत, डॉ. अंकुश कदम, नितीन जाधव, बसवराज मंगरुळे , ऍड. दत्तात्रय भांगे, डॉ. योगिता होके पाटील, डॉ. व्यंकट लांब, डॉ. अपर्णा पाटील, काशिनाथ देवधर, अधिसभा सदस्य देविदास पाठक, डॉ संंजय कांबळे, सतीश गावीत, डॉ. बाबासाहेब डोळे, संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखाधिकारी, श्रीमती सविता जंपावाड, श्री नितीन जाधव, प्राचार्य आबासाहेब देशमुख, माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, एम. डी. देशमुख, भा.न. शेळके, प्राचार्य प्रा. संदीप देशमुख, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, प्राचार्य डाॅ. प्रशांत चौधरी, एम. डी. गायकवाड, नितीन बागल, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.