वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने शासकीय नर्सिंग कॉलेज,धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाने दैदीप्यमान यश संपादन केले.विद्यालयातील कु.श्रावणी अशोक शेळके इयत्ता आठवी (ब )मधील विद्यार्थिनीने या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील सेजल बाळासाहेब भांडवले इयत्ता आठवी (ब) मधील या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत राणाप्रताप दयानंद कवडे इयत्ता नववी(ब) मधील या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला. संस्कृती सिद्धेश्वर जाधव इयत्ता आठवी (ब) मधील या विद्यार्थिनीने या स्पर्धेत जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनाएस.बी.बावकर, एस.व्ही.क्षीरसागर, जी.एम. देशमुख व एस. एम.पवार यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर.थोरबोले, पर्यवेक्षकबापूसाहेब सावंत, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षिकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.