धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, धाराशिव येथील फार्मसी विभागामध्ये आज पहिल्या वर्षाच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडवानसेस इन कम्प्यूटर सायन्स हा नाविन्यपूर्ण प्रशिक्षण आयोजित केला होता. कॉलेजचे प्राचार्य, डॉ. विक्रमसिंह माने यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेनिंग सेशनचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. चैतन्य जगताप यांनी या ट्रेनिंगमध्ये एच टी एम एल, एक्स एम एल, सी एस एस, याबद्दल प्रशिक्षण दिले. त्या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या ट्रेनिंगमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट, वेबपेज क्रिएशन, याबद्दलही विद्यार्थ्यांना हँड्स ओन ट्रेनिंग करून घेतली. सध्या फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांना विविध आयटी कंपनीमध्ये कंप्यूटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वर आधारित कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज आहे. फार्मसी विभाग हा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संलग्न असल्यामुळे फार्मसी विभागातील मागील तीन वर्षांमध्ये नमंकित टी.सी.एस, मुंबई,विंमटा हैदराबाद, ऍडव्हान्टमेड पुणे, गिफ्ट छत्रपती संभाजीनगर व आय के सोल्युशन मुंबई यासारख्या नामांकित आयटी कंपनीमध्ये तीसहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून बदलती गरज लक्षात घेता तेरणा इंजीनियरिंग महाविद्यालयातील फार्मसी विभागामध्ये या ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रशिक्षणामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांनाही आयटी क्षेत्रामध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रशिक्षणाचे नियोजन फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती माने, डॉ. गुरुप्रसाद चिवटे व प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले. तसेच प्रा. संदीप नलगे व प्रा. ऋषिकेश हिंगमिरे यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मदत केली.