धाराशिव (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या  AAA  समितीने नुकतीच भेट दिली.

सदर समितीने शैक्षणिक,प्रशासकीय आणि संपूर्ण पायाभूत सुविधांची तपासणी करून शिफारशी सुचविल्या आहेत. महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणि विज्ञान विभागातील सीआरसी प्रयोगशाळा या उपक्रमाचे कौतुक केले आहे.  

पदवी आणि पद्युत्तर पदवीसाठी सलग दोन वेळा विद्यापीठांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी स्वप्नाली मगर हिचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी आपल्या पीपीटी सादरीकरणामधून संपूर्ण महाविद्यालयाची माहिती समिती समोर सादर केली. आणि दिवसभर संपूर्ण विभागाची पीपीटी द्वारे आणि प्रत्यक्ष भेट देऊन समितीने पाहणी केली.

या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर कुंभार, तर सदस्य डॉ.एस पी थोरात, प्रोफेसर डॉ. ए. एस.कुंभार, डॉ. एस.आर.कट्टीमणी, डॉ.जी. के.सोनटक्के,डॉ.संदीप पाटील हे होते. सदर समितीचे नियोजन प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या तयार करून करण्यात आली होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.मंगेश भोसले यांनी समितीचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.

 
Top