परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे 79 वा स्वतंत्रता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

परंडा येथील ज्येष्ठ विधीज्ञ तथा महाविद्यालय विकास समिती संस्था सदस्य ॲड.संतोष सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव हे उपस्थित होते.सांस्कृतिक विभाग शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शासनाच्या आदेशाप्रमाणे महाविद्यालयात तंबाखू मुक्तीची  सामूहिक रीत्या शपथ  घेण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनील जाधव प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.संतोष सूर्यवंशी ,उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे आदी उपस्थित होते.या प्रजासत्ताक दिनानिमित्त कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी स्वतंत्रता दिनाच्या सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


 
Top