तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावण महिन्यातील धार्मिक भावनेला जोड देत युवा सामाजिक कार्यकर्त्या प्रियांकाताई विजय गंगणे यांनी तुळजापूर शहरातील विविध भागांतील तब्बल 70 महिलांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. चार टेंपो ट्रॅव्हलरद्वारे या महिलांना पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, अंभाजोगाई अशा प्रमुख देवस्थानांचे दर्शन घडविण्यात आले.
धर्मस्थळांच्या भेटीनंतर या महिलांना सोलापूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घडविण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात प्रियंकाताई गंगणे यांनी त्यांचे पती कृषीउत्पन्नबाजार समिती सभापती विजय सर गंगणे यांच्या माध्यमातून त्यांनी मुस्लीम सण ईद, हिंदुंचा सण दिवाळी हे साजरे करण्यासाठी गेली दहा वर्षापासुन गोडधोड करण्यासाठी व सण साजरे करण्यासाठी हजारो कुंटुंबाना शिधा साहित्य रुपी मदत करीत आहेत विशेषता गोरगरीब वस्तीतील लोकांना आवर्जून घरी बोलवुन मदत करतात हे प्रियंकाताई व विजयसर गंगणे हे दांम्पत्य सर्वजाती धर्माचा सण उत्सवात सहभागी होवुन त्यांना सण आनंदात साजरे करण्यासाठी मदतीचा हात देत आले आहेत.