धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील अग्रमानांकित तथा बहुराज्यीय बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या व धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर व अहिल्यानगर आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली मराठवाड्यातील बहुजराज्यीय नागरी सहकारी बँक म्हणून जनता सहकारी बँक सभासदांच्या विश्वास आणि सहकार्यातून प्रगती करत आहे. कर्जदार, सभासदांच्या सहकार्यानेच बँकेचा एनपीए सलग दुसऱ्या वर्षी शून्य टक्के ठेवण्यात बँकेची यश मिळाले आहे. बँकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 45 कोटींचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी दिली.
जनता सहकारी बँकेची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 17 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात धाराशिव येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक विश्वास शिंदे, आशिष मोदाणी , बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, सीए. दीपक भातभागे, विनोद साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके व आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना चेअरमन वसंतराव नागदे यांनी सांगितले की, उस्मानाबाद शहराचे नामांतर झाल्यामुळे व सभासदांच्या मागणीप्रमाणे बँकेच्या नावात उस्मानाबाद जनता सहकारी बँक ऐवजी जनता सहकारी बँक लि.धाराशिव असा बदल केला आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, कमी होणारी गुंतवणूक व्याजदरातील चढउतार व वाढणारी महागाई अशा अनेक आर्थिक कठीण परिस्थितीमध्ये बँकेने 3146 .77 कोटी रुपयाचा व्यवसाय टप्पा पार केला आहे. बँकेचे एकूण 78 हजार 279 सभासद असून, भागभांडवल 79.68 कोटी, निधी 498.34 कोटी, ठेवी 1876 कोटी, गुंतवणूक 1096.63 कोटी, कर्ज वाटप 1270.11 कोटी, बँकेचे एकूण कर्जदार 12 हजार 689 व ठेवीदार चार लाख 21 हजार 665 इतके असून बँकेचा मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही निव्वळ एनपी शून्य टक्के आहे बँकेचा एकूण व्यवसाय 3146.77 कोटींचा टप्पा पार केलेला आहे. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात 45.07 कोटी रुपयांचा नफा मिळालेला आहे. संचालक मंडळाने बँकेच्या सर्व सभासदांना या वर्षी 8% टक्के लाभांश देण्याची घोषणा श्री नागदे यांनी यावेळी जाहीर केली. बँकेकडे धाराशिव येथील शाखा व मुख्यालय , शिवाजी चौक लातूर , उदगीर , बीड, बार्शी, दत्त चौक सोलापूर, पंढरपूर, चाटे गल्ली सोलापूर, भूम, परंडा , उमरगा, नळदुर्ग , औराद व अहमदपूर अशा एकूण 14 ठिकाणी स्वमालकीच्या जागा आहेत. बँक आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असावी या दृष्टीने बदलत्या काळानुसार बँकेने बदल स्विकारून 24 तास एटीएम सेवा , स्वीप मशीन सेवा , डेबिट कार्ड सेवा, आयएमपीएस , आरटीजीएस , एनइएफटी , एसएमएस , एबबीबी , सीटीएस ,क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग ,क्यूआर कोड आदी सुविधा कार्यान्वित केल्या असून लवकरच मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग व इतर डिजिटल बँकिंग सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे संचालक मंडळाने एक पथदर्शी धोरण , व्हिजन समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होत आहे. सभासद , ग्राहक व ठेवीदार आणि कर्जदार यांच्या बँकेवरील विश्वास व्यवस्थापन मंडळ व संचालक मंडळाने दिलेले सहकार्य आणि कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत याच्यामुळे बँकेने प्रगतीचे यशस्वी शिखर गाठले आहे थकीत कर्जदार यांनी कर्ज वसुली कारवाईचा कटू अनुभव टाळण्यासाठी वेळेत कर्ज परतफेड करावी व बँकेच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा बँकेने ग्राहकांकरता विविध योजना व ठेवीवर आकर्षक व्याजदर तसेच अतिशय अल्प दरात कमीत कमी वेळेत व महिलांकरता सोनेतारण अल्प व्याजदर सवलती मध्ये दीर्घ मुदती कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी त्यांचा पुरेपूर फायदा घ्यावा बँकेने बचत ठेव खातेदारांकरिता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वीस रुपये भरून दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण घेण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसोबत करार केला असून बचत ठेवीदार यांनी यासाठी अर्ज करावा बँकेच्या वतीने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरिता आरोग्य विमा घेण्यात आला आहे. या वर्षात भारतीय रिझर्व बँकेकडून बँकेस कार्यक्षेत्र वाढविण्यास व बँकेच्या नवीन तीन शाखा उघडण्यास परवानगी मिळू शकते त्यामुळे लवकरच सोलापूर ,अहिल्यानगर आणि बिदर जिल्ह्यात नवीन तीन शाखा सुरू करणे तसेच बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कलबुर्गी (गुलबर्गा) व विजापूर जिल्हा वाढविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.