उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील एकोंडी येथील संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस दि. 26 जुलै रोजी साजरा करण्यात आला.
हा दिवस कारगिल युद्धात भारताच्या विजयाचे स्मरण करतो आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थाध्यक्ष अनुप चिंचोळी, कार्यवाहक धनराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी सोनकांबळे किशोर मार्गदर्शन करताना म्हणाले की,“1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले आणि विजय मिळवला. कारगिल विजय दिवस हा भारतीय जवानांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जीवनमाला अळंगे तर प्रमुख पाहुणे कोर्डिनेटर लक्ष्मीकांत मुलगे, नाजमीन सौदागर हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरयू पोतदार, शिरसले मॅडम आणि सर्व शिक्षक, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा माने तर आभार तब्बसुम मुजावर यांनी व्यक्त केले.