उमरगा (प्रतिनिधी)-  माऊली प्रतिष्ठान उमरगा संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि आलेल्या रुग्णांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश ठेवून आज सामाजिक भान म्हणून माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आज आरओ वॉटर ़िफल्टर सस्नेह भेट देण्यात आले. 

रुग्णाच्या सेवेत अहोरात्र झटणाऱ्या आरोग्यसेविका यांच्यासह रुग्णालयात जितक्या महिला वर्ग उपस्थित होता. त्या सर्वांना माऊली प्रतिष्ठानच्या वतीने साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.  तत्पूर्वी माने यांचामहादेव मंदिर रस्त्यावरील कार्यालयात फटाकाच्या आतिशबाजीत मान्यवरांच्या उपस्थितीत फेटा, शाल हार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ बिचकाटे, डॉ संदीप बनसोडे उद्योजक गिरीश सुरवसे, माधव पवार, सरपंच अनिल बिराजदार, भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, राहुल सुरवसे, विठ्ठल चिकुंद्रे, डॉ पेठसांगवीकर, विष्णू पांगे- पाटील, सुरेश मडोळे, भानुदास बोरुळे, उमाजी मंडले, अमर करके, रोहित सूर्यवंशी शैलेश नागणे आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top