उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील बलसूर येथील श्नी. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शनिवारी (ता.26) कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
माजी सैनिक संतोष सगर (काळा निंबाळा) यांची मुलाखत इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील कु. सई सांगवे यांनी घेतली. अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.एन.जाधव होते. यावेळी प्रा. परमेश्वर सूर्यवंशी, प्रा. परमेश्वर कांबळे, प्रा. डी. आर. राठोड ,प्रा. आय .आर. पोतदार ,प्रा. सचिन चव्हाण प्रा. सचिन घोगे, प्रा. यू.पी. कांबळे, प्रा. अक्षय जाधव प्रा. वर्षा जगताप, प्रा, मधुमती पाटील, प्रा. वामन भोरे, प्रा. विजय घोडके , प्रा. गोवर्धन पाटील, के .डी. कांबळे, हृदयनाथ कवठे, मधुकर सरवदे आदींची उपस्थिती होती.
कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने माजी सैनिक संतोष सगर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून सैनिकांचे जीवन अभ्यासाता आले. कु. सई सांगवे यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून माजी सैनिक सगर साहेब यांच्या कडून सैनिकी पेशा संबंधीची माहिती प्रश्नावलीच्या माध्यमातून घेतली. एक आगळावेगळा उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील सैनिकांचे जीवन मुलाखतीच्या माध्यमातून समजून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डी .आर. राठोड यांनी मांडले.