परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक डॉ.सचिन साबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे तसे मान्यतेचे पत्र विद्यापीठाकडुन प्राप्त झाले आहे.
सचिन साबळे यांच्या संशोधन मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर,अध्यक्ष सुनील शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे,स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख, कार्यालय अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.सचिन साबळे यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.