भुम (प्रतिनिधी)- सोलापुर येथील ड्रीम फाऊंडेशन यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणारा “डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार“ या वर्षी ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र' चे संस्थापक संचालक महारुद्र माडेकर यांना प्रदान करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 10 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सदरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अतिशय तळागाळातील ग्रामीण बेरोजगाराला उपलब्ध असलेल्या इंग्रजी माध्यमातील संकेतस्थळाचा वापर करून पाहिजे तेवढे रोजगाराच्या संधी शोधणे शक्य होत नसल्याने विशेतः ग्रामीण भागातील उमेदवारांची दाखल घेऊन देशातील पहिले मराठी नोकरी विषयक संकेतस्थळ तयार करून बेरोजगार युवक- युवतीकरिता रोजगाराच्या मुख्यप्रवाहाच्या वाटेवर येण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सदरील पुरस्कारासाठीमहारुद्र माडेकर यांच्या नावाची निवड समितीने केली होती. सदरील पुरस्कार रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सोलापूर येथे ज्येष्ठ वैज्ञानिक व डॉ. कलाम सरांसोबत काम केलेले डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते व वे. मु. बसवराज शास्त्री (सोमेश्वर मठ), व्यंकटेश गंभीर, प्रकाश राठोड (माजी सह आयुक्त व अध्यक्ष- सेवा फाउंडेशन),. प्रा. व्ही. एस. अंकलकोटे (अध्यक्ष- महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान, पुणे), काशिनाथ भातगुणकी (अध्यक्ष- ड्रीम फाउंडेशन, सोलापूर) यांच्यासह इतर विविध क्षेतारील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असून सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा, डॉ. कलाम यांचे ग्रंथ व रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.