धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधानांच्या नेतृत्वात हवामान नियंत्रण हा सर्वोच्च अजेंडा आहे. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धा (एनएसपीसी) आयोजित केली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.150 पेक्षा अधिक महाविद्यालयातील युवकांनी ‘राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धा (एनएसपीसी)' या ऑनलाइन परीक्षेमध्ये सहभाग घेतला असून 142 युवकांनी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून त्यांच्या पर्यावरण बदल ज्ञानात वाढ केली आहे,या पर्यावरण उपक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरामध्ये कंटूर ट्रेंचिंग हा उपक्रम राबविण्यात आला. ट्रेंचिंगची मुख्य उद्दीष्टे म्हणजे पाण्याचा प्रवाह अडथळा आणणे आणि त्यास साठवणे , याचा परिणाम मातीची धूप रोखली जाते तसेच भूजल पातळी वाढण्यास देखील मदत होते.
महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कुटुंब किंवा समाज अशा भिन्न स्तरांवर वावरत असताना विद्यार्थ्यांमध्ये पाणी, ऊर्जा, स्वच्छता, जैवविविधता संरक्षण याबाबत सवयी विकसित होण्यासह पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करणे अशा मुख्य उद्देशांसह ग्रीन क्लबची रचना करण्यात आलेली आहे.
गतवर्षी च्या मूल्यांकना नुसार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ग्रीन क्लब ने जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक पटकावला असुन तो या वर्षी उत्कृष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी पाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहभागींशी संवाद साधला व आपण लवकरच विद्यार्थ्यांचे ग्रुप करून पर्यावरण विषयक वेगवेगळी प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणार आहोत. त्यातील निवडक समाजोपयोगी पर्यावरणावरील प्रोजेक्ट *नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पिटिशन 2025 मध्ये पाठवणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. डी . मुंडे , राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, प्रा. अभिजीत कदम यांनी ग्रीन क्लब फॅकल्टी कोर्डिनेटर , प्रा. आर.एस.हिंगमिरे , प्रा . अल्मास शेख ,श्री आर.ल. मुंडे ,श्री खंडू कलाल, श्री. ओम मुंडे यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.