भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषद सदस्यपदी बाळासाहेब क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल परंडा विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षिय रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या कांहि दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या भाजपच्या राज्य परिषद सदस्यपदी परंडा विधानसभा निवडणूक अध्यक्ष असलेले बाळासाहेब क्षिरसागर यांची सदस्यपदी निवड झाली. या निवडीबदल विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी व्यक्तीगत भेटून सत्कार केला. शनिवार दि. 19 जुलै 2025 रोजी राज्य परिषद सदस्यपदी बाळासाहेब क्षिरसागर यांच्या निवडिबद्दल भाजपच्या पक्ष कार्यालयात जाऊन सत्कार केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष तानाजी पाटिल, कॉग्रेस आय जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना उबाठा गठ तालूका प्रमुख अनिल शेंडगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटिल, माजी तालूका अध्यक्ष महादेव वडेकर, तालूका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, संतोष वरळे, आलिम शेखसर, संतोष औताडे, रासपचे गजानन सोलंकर, हभप बन्सी काळे, शुभम खामकर आदिंची उपस्थिती होती.