धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहक पंचायत महाराष्ट्र धाराशिवच्या अधिवेशनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. शनिवार दिनांक 19 जुलै रोजी या दोन दिवशीय अधिवेशनाचे उद्घाटन सोलापूर मनपाचे सहाय्यक आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष डॉक्टर विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, संघटक सर्जेराव जाधव, सह संघटक मेधाताई कुलकर्णी,सहसचिव प्रा सुरेश पाटील, कोषाध्यक्ष सुनिता राजे घाडगे, राज्य सदस्य प्रमोद कुलकर्णी, मराठवाडा संघटक हेमंत वडणे, जिल्हाध्यक्ष अजित बागडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी धाराशिव कळंब मतदारसंघाचे विधानसभा सदस्य कैलास पाटील यांनी अधिवेशनास भेट दिली. या अधिवेशनास राज्यातील 27 जिल्ह्यातील जवळपास 600 साधक महिला पुरुष हजर होते. पहिल्या दिवशी विविध विषयावर राज्यभरातून आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना सहाय्यक आयुक्त श्री पवार म्हणाले की, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेची सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे. या संघटनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. राज्यभरात कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. त्यांचा तळागाळातील ग्राहकांशी चांगला संपर्क आहे. या कार्यकर्त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य ग्राहकांच्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास तळागाळातील ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण होईल. याचा शासनाला व प्रशासनाला मोठा फायदा होईल. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अजित बागडे, उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, सचिव आशिष बाबर, संघटक रवी पिसे, सह संघटक विशाल शिंदे, सचिन कवडे, शरद वडगावकर, पुनम तापडिया हे परिश्रम घेत आहेत. 


ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला काम करत असताना हवे ते सहकार्य मागावे. आम्ही ते सहकार्य करण्यास कायम तत्पर आहोत. सर्वसामान्य ग्राहकांच्या अडीअडचणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्यमुळे सुटण्यास मोठी मदत होत आहे. यासोबतच या पदाधिकाऱ्यांनी ही इतर महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देऊन निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. 

आमदार कैलास पाटील.

 
Top