तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” मंगळवार, दि 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण पुजार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि तहसीलदार अरविंद बोगळे यांच्या प्रमुख  उपस्थितीत होणार आहे. 

या मेळाव्यात 20 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसी अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक व बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर आणि कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सर्व पात्र उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


 
Top