तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवास सोमवार दि. 22 सप्टेबर 2025 रोजी घटस्थापना करण्यात येवून प्रारंभ होणार आहे. याचा सांगता मंगळवार दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मंदीर पोर्णिमा दिनी होणार आहे.

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी देविजींची मंचकीनिद्रा, सोमवार दि. 22 सप्टेबर 2025 पहाटे देविजींची सिंहासनावर स्थापना, दुपारी12 वाजता घटस्थापना ब्राम्हणास वर्णी देणे, राञौ छबिना. मंगळवार दि. 23 सप्टेबर रेजी श्रीदेविजींची नित्योपचार पुजा व राञौ छबिना, बुधवार दि. 24 सप्टेंबर रोजी श्रीदेविजींची नित्योपचार पुजा व राञौ छबिना, गुरुवार दि. 25 सप्टेंबर श्रीदेविजींची नित्योपचार पुजा व राञौ छबिना, शुक्रवार दि. 26 सप्टेंबर ललिता पंचमी रथअलंकार पुजा व राञौ छबिना, शनिवार दि. 27 सप्टेंबर श्रीदेविजींची मुरली अलंकार पुजा राञौ छबिना,  रविवार दि. 28 सप्टेंबर श्रीदेविजींची शेषशाही अलंकार पुजा व राञौ छबिना, सोमवार दि. 29 सप्टेंबर श्रीदेविजींची भवानी तलवार अलंकार पुजा राञौ छबिना, मंगळवार दि. 30 सप्टेंबर दुर्गाष्टमी महिषासुर मर्दीनी पुजा, दुपारी 1 वाजता होमहवनास सुरुवात,सांयकाळी 06.10 वाजता पुर्णाहुती राञौ छबिना, बुधवार दि. 1 आँक्टोबर  रोजी  श्रीदेविजींची नित्योपचार पुजा दुपारी बारा वाजता धार्मिक विधी (होमावर ) घटोत्थापन व राञौ पलंग पालखी मिरवणूक, गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी पहाटे श्रीदेविजींचे सिमोल्लंघन विजयादशमी दसरा सार्वत्रिक सिमोल्लंघन मंचकीनिद्रा,            सोमवार दि. 6 ऑक्टोबर रोजी कोजागीरी पोर्णिमा, मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी मंदीर पोर्णिमा पहाटे श्रीदेविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, सोलापूर काठी  छबिना जोगवा, बुधवार दि. 8 ऑक्टोबर अन्नदान महाप्रसाद व राञौ छबिना.

 
Top