तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागात सोमवारी राञभर, मंगळवार दुपार पर्यत सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने भाविकांसह शहरवासियांना याचा मोठा फटका बसला. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात विजेचा मोठा खेळखंडोबा झाला आहे. निकृष्ट दर्जाचे विद्युत साधने ठेकेदार वापरत असल्याने याचा फटका भाविक नागरिक व ग्राऊंड लेवल वरच्या कर्मचाऱ्यांना बसला. येथील ठेकेदार मालामाल झाले आहेत.
सतत वीज पुरवठा अचानक खंडीत होत असल्याने पावसाळा पुर्वतयारी बाबतीत महाविणरणची पोलखोल झाली. श्रीतुळजाभवानी भक्त देविचा वारा दिवशी कुलधर्म कुलाचार करण्यासाठी सोमवारी राञी मोठ्या संखेने तिर्थक्षेञ तुळजापूरात खाजगी वाहनाने बससे ने येतात. माञ सोमवारी राञी ते मंगळवार पहाटे पर्यत दहा ते पंधरा वेळा लाईट ये-जा होत असल्याने सहकुटुंब दाखल झालेल्या भाविकांना याचा मोठा ञास बसुन त्यांचात असुरक्षिततेची व भितीची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली. महिला, लहान मुले, वृद्ध असल्याने तुळजापूरात दाखल होताच अंधाराचे साम्राज्य दिसताच महिला, मुले भितीने ग्रासुन गेले होते. याचा फायदा रिक्षावाल्याने जादा पैसे घेवुन घेतला. तिर्थक्षेञ तुळजापूर सारख्या महत्त्वाचा तिर्थक्षेञी विज पुरवठाची दुरावस्था पाहिल्या नंतर विद्युत साधने निकृष्ट दर्जाचे तर बसवले नाहीत ना अशी शंका निर्माण होते. शहरातील विद्युत पुरवठा टेंडर खाजगी ठेकेदारांना दिले जाते ते दुरुस्ती कामे न करता कोट्यावधी रुपये लुट करीत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी या ठेकेदारांना जाब विचारणार का नाही असा सवाल निर्माण होतो.
पावसामुळे केबल वायर खराब झाल्याने सतत लाईट ये-जा होत असुन दुरुस्ती काम पुर्ण होताच अखंडीत विद्युत पुरवठा होईल. अशी प्रतिक्रिया महावितरणचे अभियंते वाकुरे यांनी दिले.