तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे भाविकांच्या सोयीसाठी प्रसाद सेवा सुरू करण्यात येत आहे. या प्रसाद सेवेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता मंदिर परिसरात उत्साहात पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे. एका प्रसादाच्या लाडूची किंमत 30 रूपये ठेवल्यामुळे भाविकांत नाराजी पसरली आहे.

भाविकांना दर्जेदार व सुलभ सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रसाद सेवा सुरू केली जात असून, या उपक्रमामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद सेवा आनंददायी व भक्तिमय ठरणार आहे. या उद्घाटन समारंभास श्री तुळजाभवानी देवीच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

 
Top