धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी  श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. सध्या राज्यभरातील धार्मिक स्थळांवर पर्यावरण विभागाकडून ‌‘नो प्लास्टिक' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

या मोहिमेचा एक भाग म्हणून आज त्यांनी तुळजापूर येथील मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली.या बैठकीत मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले.यावेळी भाविक व विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करत प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला.

यावेळी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी स्वागत करून महावस्त्र देऊन सत्कार केला. मुंडे यांनी दर्शन व बैठक आटोपून मोटारीने अक्कलकोटकडे प्रयाण केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे, गुलचंद व्यवहारे आदी उपस्थित होते.


 
Top