भूम (प्रतिनिधी)- मौजे सावरगाव ते धस पिंपळगाव रस्त्याच्या साईट पट्टीवरील झाडे जोडपे काढण्याची मागणी गोविंद गरड यांनी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.

भूम सावरगाव धस पिंपळगाव ते बार्शी हा रस्ता दळणवळणासाठी दोन्ही तालुक्यात जवळचा असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रस्त्याच्या साईट पट्टीवरील वाढलेली झाडे झुडपे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने व वळणावरील झाडामुळे समोरून येणारी वाहने न दिसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे सदरील मार्गावर भूम सावरगाव धस पिंपळगाव असे बस सेवा सुरू असून एसटी बसच्या चालकांनी झाडाझुडप्यामुळे सतत अडचणी येत असल्याची तक्रार आगार प्रमुख यांच्याकडे केल्याने भविष्यात या मार्गावरील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे .सदर एसटी बस मुळे विद्यार्थी शिक्षणाकरता भूम आणि बार्शी या ठिकाणी ये जा करतात रस्त्याच्या अडचणीमुळे बस सेवा बंद झाली तर विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे .तरी प्रशासनाने तात्काळ भूम ते सावरगाव बार्शी रस्त्यावरील येणारे झाडे झुडपे काढून घ्यावीत अशी मागणी होत आहे.


 
Top