भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी येथील पदवीधर शिक्षक धनराज परमेश्वर हत्तुरे हे शाळेला सतत गैरहजर राहतात. व्यसन करुन येतात असा आरोप शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष हरिदास आहेर यांनी लेखी निवेदनातुन (ता.12) रोजी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
धनराज हत्तुरे हे मागील शैक्षणिक वर्षांमध्ये फक्त 126 दिवस शाळेला उपस्थित राहिले असून 108 दिवस शाळेला गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे शिक्षक शाळेला गैरहजर राहतात व मद्यपान येत असल्याचे आरोप केले जातं आहेत. त्या शिक्षकामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या ही घटली आहे. त्यामुळे त्या संबंधित शिक्षकांची तात्काळ बदली करावी अन्यथा आम्ही गटशिक्षणाधिकारी कार्यालय भूम येथे मंगळवारी (ता.17) रोजी शाळेतील सर्व विद्यार्थी यांना घेऊन येऊ व त्या ठिकाणी शाळा भरवु असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन प्राप्त होताच शिक्षण विभागाची धावपळ विस्तार अधिकारी अनिता जगदाळे यांनी दिली शाळेला भेट तो शिक्षक दिनांक 16 जून रोजी शाळेला उपस्थित राहणार नाही असं दिले लेखी आश्वासन दिल आहे. शाळेला उपस्थित राहणार नाही पण बदली च काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
“ पंचायत समिती भूम विस्तार अधिकारी यांचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित शिक्षकावर योग्य कार्यवाही करण्यात येईल.“
अशोक पाटील
शिक्षणाधिकारी (प्रा)
“ डोकेवाडी गावातील लोक फक्त फोन वर तक्रार करतात.आता लेखी तक्रार मिळाली आहे.त्या संबंधित शिक्षकांची बदलीसाठी सहा-सात महिने लागतील आम्ही आमचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवू देणार आहोत.
राहुल भट्टी
(गट शिक्षणाधिकारी,भूम)
आमच्या शाळेतील शिक्षक धनराज हत्तुरे हे मागील वर्षातील केवळ 126 दिवस शाळेला उपस्थित होते.ते 108 दिवस शाळेला अनुपस्थित होते.वेळीवेळी आम्ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयास यांच्या गैरहजेरीचा अहवाल दिला आहे. यांच्या विद्यार्थी यांच्या परीक्षा ही आम्ही घेतल्या पेपर ही आम्ही तपासणी केली.
अभिमन्यू निकम
मुख्याध्यापक,जि.प.शाळा डोकेवाडी.