तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील जुन्या जागीच पण नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या बसस्थानक भाविक प्रवाशांचा सेवेत रूजु झाले आहे. यामुळे भाविक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

येथील नवीन बसस्थानकाचे  उद्घाटन नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले आहे.  या प्रकल्पासाठी एकूण 7.91 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये 3.61 कोटींच्या निधीचा वापर बांधकामासाठी करण्यात आला. सदरील बसस्थानकात 11 फ्लाट आहेत. या बसस्थानकातुन सर्वच भागातील बसेस जाणार असल्या तरी प्रामुख्याने शहराभागात येथुन बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नगर, नाशीक, लातुर, सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव आदी भागासाठी येथुन बसेस ये-जा करणार आहेत. येथुन दररोज चारशेच्या आसपास फेऱ्या होणार आहेत. सदरील बसस्थानक चोवीस तास अखंड चालु असणार आहे. लातुर रोडवरील बसस्थानकातुन ग्रामीण भागातील बसेस सुटणार आहेत. तसेच येथे स्टाँफ पुरवला असल्याची माहीती आगार प्रमुख शिंदे यांनी दिली.


आधुनिक सुविधा युक्त बसस्थानक !

नवीन बसस्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे आणि तांत्रिक सुविधा यांचा समावेश आहे.  या बसस्थानकाचे डिझाइन तुळजापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला साजेसे ठेवण्यात आले आहे.


 
Top