धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांनी अलीकडेच केलेल्या भूतान दौऱ्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी नव्या दृष्टीकोनातून संकल्पना मांडल्या आहेत. भूतानमधील विविध औद्योगिक, कृषी व पर्यावरणस्नेही उपक्रमांचा सखोल अभ्यास करत त्यांनी धाराशिवमध्ये शाश्वत उद्योगांची उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भूतानमध्ये प्राधान्याने पाहिल्या गेलेल्या ग्रॉस नॅशनल हॅपिनेस या संकल्पनेपासून प्रेरणा घेत तेथील लघुउद्योग, स्थानिक उत्पादने, हस्तकला, पर्यावरणपूरक पर्यटन अशा क्षेत्रातील कार्यपद्धतींचा अभ्यास करत त्यांनी धाराशिवसाठी योग्य मॉडेल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

“भूतानचा हा दौरा केवळ पर्यटन नव्हे, तर धाराशिवच्या प्रगतीसाठी नवा दृष्टीकोन घेऊन आलेला आहे. येथे स्थानिक उत्पादकता, शाश्वत विकास व सामूहिक सकारात्मकतेचा मंत्र आहे. हा अनुभव जिल्ह्यातील तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरेल,” असे ॲड. गुंड यांनी सांगितले. या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी धाराशिवमध्ये नव्या उद्योगसंधी निर्माण करण्याचा, लघु व कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी या दौऱ्या त चालना मिळाली. तसेच, धाराशिव जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी युती सरकारच्या माध्यमातून विशेष सवलती व धोरणात्मक मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
Top