धाराशिव( प्रतिनिधी)-जिल्हा परिषद वडगाव येथील दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी आदित्य पांढरे हा शिक्षणापासून दुरावलेला होता. शिक्षणाविषयीचा असलेला न्यूनगंड त्यामुळे तो शाळेत हजर राहत नसे.परंतु मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना अंतर्गत शिक्षक श्री रवींद्र पोवळे यांनी त्या विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणून त्यामध्ये असणारा न्यूनगंड दूर केला.विविध मार्गातून त्याला मदतीचा हात देऊन दहावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहित केले.एका मजुराचा मुलगा दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापक ज्योती राऊत, रोहित चौधरी ,सर्व शिक्षक शिक्षिका यांचे आदित्य पांढरे यांनी त्याचे अभिनंदन केले या सर्वांचे त्याला  मार्गदर्शन मिळाले.  या यशाबद्दल आदित्य पांढरे याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top