नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग:- धाराशिव जिल्हातील नळदुर्गचे एन.टीव्ही न्यूज मराठी चे जिल्हा प्रतिनिधी आयुब शेख यांना नुकताच महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कणखर निर्भीड लेखणी आणि एन टीव्ही न्यूज मराठी महाराष्ट्र या वृत्त वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक जनसामान्यांच्या प्रश्ना बरोबरच सामाजिक, राजकिय अनेक विषयांवर लिखाण करत आपल्या माध्यमातून जन सामन्याच्या प्रश्नांला न्याय मिळवून दिला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच पत्रकार आयुब शेख यांच्यावर तुळजापूर तालुक्यासह जिल्हातुन अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.धाराशिव जिल्ह्यात निर्भड पत्रकारिता करत असल्याने एन.टीव्ही न्यूज चे मुख्य संपादक इकबाल शेख यांनी आयुब शेख यांना महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार एन.टीव्ही न्यूज मराठी च्या 23 व वर्धापन दिनाच्या सोहळ्यात दिला मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे