धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पोलिस अधीक्षकपदी रितु खोकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
खोकर या सध्या सांगली येथे अपर पोलिस अधीक्षक असून, 2018 बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना 141 रॅक मिळाली होती. त्यांचे वडील माजी सरपंच असून, मुळ गाव हे पानिपत येथे आहे. त्या कुरूक्षेत्र विद्यापीठाच्या एमएससी गोल्ड मेडलिस्ट आहेत. तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरण यासह अन्य बाबी त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. संजय जाधव हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यातील 22 आयपीएस अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.