धाराशिव (प्रतिनिधी)- बऱ्याच आर्थिक विकास महामंडळाने कर्ज वाटप केले. परंतु ते परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे इतर आर्थिक विकास महामंडळापेक्षा आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. महामंडळाचे कर्ज परतफेड असल्यामुळे  आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अग्रेसर आहे. राज्य सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास 11 हजार 807 कोटी रूपये दिले आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेला चालना देण्यासाठी बीड येथे महामंडळाचे उपकेंद्र लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मिट द प्रेस या कार्यक्रमात पत्रकारांना दिली. 

शुक्रवार दि. 23 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमास भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी उपस्थित होते. अधिक माहिती देताना नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने ही योजना राबविण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेत काही बदल केले. त्यामुळे महामंडळाच्या योजना आज यशस्वी होत आहेत. योजनेचा लाभ ज्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांनी ऑनलाईन पध्दतीने महामंडळाच्या योजनेचा लाभ घेवून शकतात. राज्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने 13 लाख 8 हजार 781 लाभार्थी आहेत. तर त्यांना बॅकेने एकूण 11 हजार 807 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. महामंडळाने लाभार्थ्यांच्या व्याज परतावा केलेली रक्कम 1 हजार 121 कोटी आहे. तर महामंडळाकडून एकूण व्याज परतावा सुरू झालेले लाभार्थी 1 लाख 19 हजार 263 इतके आहेत. यावेळी पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँका सहकार्य करत नसल्याची खंतही बोलून दाखविली. सहकारी बँका, फायन्यास कंपन्या, पतसंस्था यांची मदत या कामी होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

यावेळी पत्रकारसंघाचे सचिव रविंद्र केसकर यांनी प्रस्ताविक केले. तर आभार अध्यक्ष देविदास पाठक यांनी मानले.


धाराशिव जिल्ह्यात 6 हजार 

धाराशिव जिल्ह्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी 6 हजार 60 आहेत. तर बॅकेने वितरीत केलेली कर्ज रक्कम 499 कोटी रूपये आहे. महामंडळाने आजपर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 52 कोटी रूपयाचा व्याज परतावा केली रक्कम आहे. आजपर्यंतचे एकूण व्याज परताव्याचे लाभार्थी 5 हजार 359 असल्याचे पाटील यांनी सांगितले. 


संभाजीनगर आणि कोल्हापूर

महामंडळाच्या अध्यक्ष झाल्यापासून मराठा समाजातील 1 लाख उद्योगपती तयार करायचे टारगेट मी ठेवले होते. ते टॉरगेज पूर्ण झाले आहे. सगळ्या जास्त उद्योगपती या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. तर त्यानंतर कोल्हापूरमध्येही उद्योजक निर्माण झाले आहेत असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 


 
Top