भूम (प्रतिनिधी)- एस.एस.सी. मार्च 2025 च्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच भूम तालुक्यातील तिन्ही नामांकित शाळांनी यशाची नवी शिखरं गाठत तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा मान उंचावला आहे. रवींद्र हायस्कूल, श्री गुरुदेव दत्त हायस्कूल (भूम) आणि विजय हायस्कूल (चिंचपूर ढगे) यांनी आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत भरीव निकालाची नोंद केली आहे.


रवींद्र हायस्कूल, भूम सलग 100% निकालाची परंपरा कायम

भूम येथील रवींद्र हायस्कूलने यंदाही 100% निकालाची उज्ज्वल परंपरा राखत उत्तुंग यश संपादन केले. यावर्षी शाळेच्या सेमी इंग्रजी विभागाचा देखील 100% निकाल लागला. विशेष उल्लेख करायचा तर कु. श्रावणी श्रीधर धारकर हिने 100% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच इंग्रजी विषयात 99 गुण मिळवत लातूर विभागातही आघाडी घेतली.

90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या इतर 28 विद्यार्थ्यांमध्ये भक्ती बनसोडे (97.60%), अथर्व बारगजे (97.00%), संस्कार सलगर (96.60%), संध्या हुंबे (96.60%), श्रुती गोरे (96.40%), शिल्पा चौरे (96.20%) आदींचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


श्री गुरुदेव दत्त हायस्कूल, भूम  99.32% निकाल, सेमी इंग्रजी विभाग 100%

लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गुरुदेव दत्त हायस्कूल, भूम या प्रतिष्ठित शाळेने 99.32% निकालाची नोंद करत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सेमी इंग्रजी विभागाचा निकालही 100% लागला आहे. शाळेतील कु. वैष्णवी बागडे हिने 100% गुण मिळवत शाळेत व गावात प्रथम क्रमांक मिळवला.

अन्य उल्लेखनीय विद्यार्थी:- आराध्या येडमे (98.80%), अदिती गिलबिले (97.60%), मधुरा पारेकर (97.40%), हूरिया सय्यद (96.80%), तनुजा नांगरे (96.40%), तनुजा मुसागडे (96.20%), निखिल फाळके (95.80%), आर्य नंदिनी (95.60%), आदींसह एकूण 31 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत

भूम तालुक्यातील विजय हायस्कूल, चिंचपूर ढगे  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

चिंचपूर ढगे येथील विजय हायस्कूलनेही गुणवत्तेची परंपरा जपत उत्तम निकालाची नोंद केली आहे. शाळेतील विद्यार्थी कुमार बालाजी मुनोत (84.40%) याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्यानंतर योगेश डोंबाळे (71.40%) व सिद्धार्थ कसबे (69.60%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश म्हणजे तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचे दर्शन आहे. शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालकांच्या सहकार्याने घडलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 
Top