धाराशिव (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा आणि प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र - भर भाजपाच्या वतीने त्रिशताब्दी जन्मोत्सव विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातही भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे मित्रा चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंहठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहाराजे निंबाळकर, अभियानाचे जिल्हा संयोजक इंद्रजीत देवकते यांचे नेत्रत्वात कार्यक्रम पार पाडला. यामध्ये व्याख्यान, वेशभुषा स्पर्धा तथेच विविध क्षेत्रात नावलौकिक व योगदान देणाऱ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी इतिहास संशोधक तथा अभ्यासक प्रा.डॉ.सतिश कदम यांनी युवक व युवतीशी संवाद साधताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे देशाप्रती असणारे योगदान तसेच महिला असूनही एक उत्तम प्रशासक व कितीही संकट आले तरी खचून न जाता प्रजेच्या संरक्षणासाठी व हितासाठी तत्पर राहत असत. वेळप्रसंगी युद्धनितीतील मुत्सद्दीपणा व आजच्या काळामध्ये पालकांनी व विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे जीवनशैली असायला पाहिजे. आपल्या पाल्याचे पालन पोषण व शिक्षण करताना अश्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. यावेळी भारत डोलारे, नंदाताई पुनगुडे, युवराज नळे, अभय इंगळे, पांडुरंग पवार, निहाल काझी, सुनील काकडे, दर्शन कोळगे, संदीप इंगळे, विलास लोंढे, निलेश शिंदे, शितल देशमुख, सतीश घोडेराव, विठ्ठल गायकवाड हे उपस्थित होते.
यावेळी लता वैजिनाथ कसबे, इंदुबाई बळीराम जाधव, विविध क्रीडा क्षेत्रातील सई गणेश सापते, पार्थ गणेश सापते, वैभव गोविंद शिडोळे, ओंकार राजेंद्र सोनटक्के, ओमप्रसाद अमरुशी निंबाळकर, संस्कृती नानासाहेब बोराडे, मनोज दिनकर जाधव, संपदा मोरे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले, मैथीली पवार, विजय जयराम शिंदे, राज चंद्रजित जाधव, अनिकेत सुरेश पवार, साईराज अनिल माने, रमणी प्रविण म्हेत्रे, रिया राहुल माने, वेदश्री आशिष जोशी, वेदांत शरद मोटे, सतेज संजय चव्हाण, नंदन पांडुरंग गोरे, हर्षवर्धन राहुल कंकाळ, शताक्षी राहुल कंकाळ,यशराज नागनाथ धनके, आदर्श अमोल यादव, वसंत प्रशांत लोखंडे, वसंत प्रशांत लोखंड, पार्थ नितीन पाटील, बोधिका धनजय जानराव, श्रेया धनंजय जानराव, बोराडे संस्कृती नानासाहेब, श्रेयश भैर खांडेकर, प्रथमेश नागनाथ गंगणे, सुमित संतोष जाधव, पियुष लामतुरे, आशुतोष माने, राम ढेकणे, अतुल करवड यांचा सन्मान केला.
यावेळी वेशभूषा स्पर्धेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चिमुकल्यांनी अहिल्यादेवीची वेशभूषा करून सादरीकरण केले. त्यामध्ये प्रामुख्याने विजेते व प्रोत्साहनपर विजेते- विजेत्याचे नाव प्रथम क्रमांक-विराक्षी लक्ष्मण देवकते, द्वितीय क्रमांक-वैष्णवी गणेश महानवर, तृतीय क्रमांक-गौरी आतिश ठवरे, प्रोत्साहनपर-माधवी मनोज गोरे,मानवी मनोज गोरे,रिंकू शंकर देवकते,आरती मनोज सलगर, रेवती गणेश थोरात,अमृता मनोज सलगर,विजेत्या व सहभागी स्पर्धकांना, रोख रक्कम,सन्मानपत्र व शाल देण्यात आली.