धाराशिव (प्रतिनिधी)- येथील भीमनगर येथील रहिवासी  श्रीमती शकुंतला गंगाधर शिंगाडे (वय 85) यांचे आजारणामुळे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1.00 वाजता बौद्ध स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सहा मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय (नाना) शिंगाडे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य विशाल शिंगाडे यांच्या त्या मातोश्री होत.

 
Top