कळंब (प्रतिनिधी)- येथील प्रोग्रेसिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मॉडेल इंग्लिश स्कूल कळंब शाळेने सलग 12 व्या वर्षी 100%निकालाची परंपरा कायम राखली. यावर्षी लागलेल्या निकालात शाळेतून प्रथम येणाचा मान हरिवृंदा पाटील 97.80%, राजेश्वरी देशमुख 97.60% यांनी मिळवला तर द्वितीय श्रेणीत येण्याचा मान आदिती अडसुळ 95.8% हिने मिळवला. तर तृतीय येण्याचा मान पुष्कर आदित्य शिंदे 92.4%, रिझवान शेख92% यांनी मिळवला आहे. तर शाळेत प्रामुख्याने यांनी प्रणाली बारटक्के 91%, अनुष्का शेवते 90.4%, भावेश महामुनी 89%, आयेशा मेहदवी 88.60, आयेशा तांबोळी 86.20%, श्रेयशी सोनी 85.8%, तुबा शेख 85.6%, आर्यन रणदिवे85%, उमेर सौदागर 84%, अफजन शेख 83.6%, आदित्य सांवत 76.20%, आदित्य सानप 76.2%, मोक्ष बागरेचा 74%, आदित्य रणदिवे 72.4%, दुर्गेश जाधव 69.8%, शेख मारूप शेख 65.2%, सार्थक कुलकर्णी 56%, अभिजित कोळपे 54%, अनमोल मानधने 50%भरघोस गुण घेऊन प्राविण्य मिळवले आहे. तर या यशाबद्दल मॉडेल इंग्लिश स्कूल कळंब येथील विद्यार्थ्यांनी सलग बाराव्या वर्षी 100%निकालाची परंपरा कायम राखली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष करसन पटेल,शाळेच्या प्राचार्या लता यंदे, माध्यमिक प्राचार्य माधव कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करून भरभरून कौतुक केले.या निकालासाठीशाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.