भूम (प्रतिनिधी)-  शंकरराव पाटील महाविद्यालय, पाथरूड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने भूम येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सहसचिव प्रा. संतोष शिंदे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी  इतिहास विषयाचे प्रा नंदकुमार जगदाळे यांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करत त्यांचे महान कार्य यावर विचार मांडण्यात आले. प्रा. संतोष शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे धैर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे अद्वितीय योद्धे होते. त्यांचे जीवन तरुणांना सदैव प्रेरणा देणारे आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. गौतम तिजारे, प्रा भोंग, कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल केशव बोराडे वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल महामुनी हारी, वरिष्ठ लिपिक कूंदन बोराडे इतर प्राध्यापक, कर्मचारी  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या आणि प्रेरणादायी विचारांनी भारलेले होते.


 
Top