भूम (प्रतिनिधी)- आरसोली येथील वाढीव पाईप लाईन माझ्या कारकिर्दीत मंजूर झाली होती. पाईप उत्तम कॉलीटीचे वापरण्यात आले व योजना मंजूर केली. शहरातील नागरिकांना पुढच्या 50 वर्षाचा विचार करून कार्यन्वीत करण्यात आली. विकास स्वतःसाठी करायचा का? गावाच्या विकासासाठी विरोधकांने ठरवावे असे विरोधकांना टोला मारत माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी पत्रकारांना माहिती दिली.
शासकीय विश्रामगृहात माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात व सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी अमृत योजना -2 वाढीव पाईप लाईन संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी त्यावेळी बाणगंगा तलावावरून पाणी पुरवठा सुरुळीत होता. त्यामुळे दररोज भूम शहराला पाणी पुरवठा केला जात होता. बाणगंगा तलावावरील पाणी पुरवठा बंद का केला? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे. मग आता 4 दिवसाआड पाणी घेण्याची वेळ शहर वासियांना का आली. याचा विचार करावा. फक्त नियोजन चुकल्याने कृतिम पाणी टँचाई दाखवली जाते. शासन दरबारी एवढ्या योजना असूनही अमृत योजना घेण्याचे कारण काय? शहरातील नागरिक 65 % शेतकरी असताना भूम शहर दुष्काळी तालुका असताना मीटरचे पाणी परवडणारे नाही. अजूनही वन्जरवाडी तलावावर पाईप पोहचले नाहीत. पंपिग स्टेशन नाही. मग नागरिकांना कशाचे नळ कनेक्शन देता. हवेचे नळ कनेक्शन देता काय ? योजना पूर्ण झाल्यास अमृत योजनेच्या जी आर मध्ये मीटरची तरतूद असल्याने अमृत योजनेचे मीटर लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता सावध व्हावे. असे परखड मत व्यक्त केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, उभाठा गटाचे तालुकाध्यक्ष अनिल शेंडगे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, राष्ट्रवादी मागासर्वगीय सेल चे तालुकाध्यक्ष गणेश साठे, ऍड अमृताताई गाढवे, माजी शहर प्रमुख दीपक मुळे, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब वीर, बच्चन शेठ गायकवाड, दीपक पवार, पिंटू पाटील, तसेच मोठया संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह थोरात यांनी टायगर अभी जिंदा है असे म्हणून आगामी निवडणुकीत पुन्हा थोरात गट सक्रिय झालेला असून जनतेच्या पाठिंबावर पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आम्ही विकासाचा राजकारण करतो स्वार्थाचे राजकारण कधीही करत नसल्याचे यावेळी सांगितले.