भूम (प्रतिनिधी)-  संजय गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये दि. 15 मे रोजी संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य संतोष शिंदे,संयोगिता गाढवे, संजय गाढवे व सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना संयोगिता गाढवे, प्राचार्य संतोष शिंदे, संजय गाढवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील व सर्व शहरातील 95 .टक्के पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कुलकर्णी, तात्यासाहेब कांबळे, दत्ता भालेराव यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक वपत्रकार बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज गाढवे, पवार, बाळासाहेब अंधारे, बालाजी माळी, महेश गपाट, मेहराज बेग सय्यद, सुनील थोरात, रामभाऊ बागडे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top